Friday, 14 February 2014
Wednesday, 12 February 2014
संध्याकाळी मी मुकुंदाच्या घरी गेलो. "मास्तर आले आहेत ना रे?"
"हो, आत आहेत. बेबीला गोष्ट सांगताहेत."
मला एकदम आठवले. मुकुंदाची पाचसहा वर्षाची मुलगी गेले वर्षभर पोलियो होऊन बिछान्यावर पडली होती. मी आत डोकावून पाहिले. मास्तर तिला गोष्ट सांगण्याच्या रंगात आले होते. कुठल्या तरी राजपुत्राची गोष्ट होती. राजपुत्राचे विमान आकाशातून गेले तेव्हा दोन्ही हात पसरून चितळे मास्तर त्या खोलीभर धावले. मी आणि मुकुंदाने एकमेकांकडे पाहिले. मुकंदाच्या डोळ्यांत पाणी तरारले होते.
"इथं आल्या दिवसापासून रोज संध्याकाळी बेबीला एक गोष्ट सांगून जातात." मास्तरांची गोष्ट संपत आली होती.
"आणी अशा रीतीनं तो राजपुत्र आणि राजकन्या अत्यंत सुखानं नांदू...?"
"लागली!" बेबी, मुकुंदा आणि मी एकदम म्हणालो. मी आणि मास्तर टॅक्सीत बसलो.
"जरा थांबा."
"काय रे?" मास्तर म्हणाले.
"काही नाही. जुनी सेवा---पायांत चप्पल नाही तुमच्या."
"राहील्या वाटतं वर. राहू दे. उद्या यायचंच आहे."
"थांबा, मी आणतो..."
"छे छे! खुळा की काय?"
मी वर गेलो. मुकुंदाच्या दारातल्या चपलांच्या स्टॅडवरून मास्तरांच्या चपला शोधून काढणे अवघड नाही गेले---
कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या!

Subscribe to:
Comments (Atom)